Havaman Andaj 2024: 1972 पेक्षा 2024 चा दुष्काळ भीषण असणार अमेरिकेच्या वेध शाळेचा अंदाज पहा पूर्ण हवामान अंदाज

Havaman Andaj 2024: 1972 पेक्षा 2024 चा दुष्काळ भीषण असणार अमेरिकेच्या वेध शाळेचा अंदाज पहा पूर्ण हवामान अंदाज

havaman andaj 2024

Havaman Andaj 2024 मध्ये मार्च ते मे या कालावधीत जगालासुपर एल निनोचा फटका बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या नोआ या संस्थेनं याबाबतचा अंदाज काही दिवसांपूर्वी दिला आहे.

आज आपण या ब्लॉग मध्ये सुपर एल निनो म्हणजे काय, त्याचा भारतातील पावसावर काय परिणाम होऊ शकतो, याची माहिती जाणून घेणार आहोत.

नोआचा Havaman Andaj 2024 काय आहे?

मार्च ते मे हा आपल्याकडील उन्हाळ्याचा कालावधी असतो. नेमका याच कालावधीत एल निनो आतापर्यंतच्या सर्वांत तीव्र स्थितीत पोहचण्याची शक्यता आहे. नोआ या संस्थेनं दिलेल्या Havaman Andaj 2024 अंदाजानुसार, मार्च ते मे 2024 या कालावधीत सुपर एल निनोचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. तीव्रएलनिनोस्थितीची शक्यता 70 ते 75 टक्क्यांच्या दरम्यान आहे. या कालावधीत विषुववृत्तीय सागरी पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे. जागतिक तापमानातही 2 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता 30 टक्क्यांहून अधिक आहे.

1972–73, 1982–83, 1997–98 आणि 2015–16 या वर्षांमध्ये अशाच प्रकारची स्थिती उद्भवल्यानं जगभरातील अनेक देशांना तीव्र तापमान, दुष्काळ आणि पूरस्थितीचा सामना करावा लागला. 2024 मध्ये अशाच प्रकारची स्थिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सुपर एल निनो म्हणजे काय?

सुपर एल निनो म्हणजे काय, जे जाणून घेण्याआधी एलनिनो म्हणजे काय ते पाहूया.

एलनिनो ही प्रशांत महासागरात तयार होणारी एक वातावरणीय स्थिती आहे. Havaman Andaj 2024 प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त होते, तेव्हा त्या स्थितीलाएलनिनोअसं संबोधलं जातं. प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान साधारणपणे 26 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत राहतं. त्यात समुद्राच्या पाण्याच्या तापमानात आणखी वाढ होऊन ते 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत होऊ शकते, या स्थितीला सुपर एल निनो म्हणतात.

हवामान अंदाज २०२४

1972 चा दुष्काळ
एल निनो आणि भारतातील दुष्काळ

प्रशांत महासागर हा जगातील सर्वांत मोठा महासागर असल्यामुळे त्यात घडणाऱ्या गोष्टी जसं की, वाऱ्यांचा जोर, त्यांच्या दिशा आणि कमीअधिक होणारे तापमान यांचा परिणाम सगळ्या जगातील हवामानावर होतो. Havaman Andaj 2024 ज्या ज्या वेळी भारतात दुष्काळ पडला आहे, त्यातल्या बहुतांश वेळी वातावरणात एल निनो सक्रिय असल्याचं समोर आलं आहे.

जसं यंदा आपल्याकडे दुष्काल पडला आहे आणि वातावरणात एल निनो सक्रिय आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एल निनो आणि भारतीय मान्सूनचा परस्पर संबंध आहे. 1871 नंतर भारतात पडलेल्या दुष्काळांपैकी 6 दुष्काळ हे एल निनोचे दुष्काळ आहेत. ज्यात अलीकडील 2002 आणि 2009 मधील दुष्काळांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे सर्वच एल निनो वर्षांमुळे भारतात दुष्काळ पडलेला नाही. उदाहरणार्थ 1997-98 या वर्षी एल निनो प्रचंड सक्रिय होता, पण त्यावेळी दुष्काळ पडला नव्हता.

सुपर एल निनोचा मॉन्सूनवर परिणाम होणार का?

सुपर एल निनोमुळे उत्तर अमेरिकेतील देशांमध्ये सरासरीपेक्षा तापमान वाढ होऊन दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

सुपर एल निनोचा भारतातील पावसावर परिणाम होऊ शकतो का?

ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे सांगतात, Havaman Andaj 2024 “भविष्यकाळात फार मोठा दुष्काळ पडेल ही जी भीती तयार केली जात आहे, ती बरोबर नाहीये. याला कारण फक्त एल निनो हा एकच फॅक्टर दुष्काळाला कारणीभूत आहे, असं नाही. हवामान बदल हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे.

हवामान बदल म्हणजे हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढणं आणि इतर मिथेन, नायट्रस ऑक्साईड याचं प्रमाण वाढणं. यामुळे पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचं तापमान 1.5 अंश सेल्शिअसनं वाढलेलं आहे. जागतिक तापमान वाढीमुळे तिथले हवेचे दाब कमी होतात, मग इकडचे वारे जिथं कमी दाबाचं क्षेत्र आहे तिथं जातात, तिथं अतिवृष्टी होते आणि इकडं दुष्काळ पडतो.

ही स्थिती हवामान बदलामुळे होते.” ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे सांगतात, Havaman Andaj 2024 “एल निनो आधी मार्चपर्यंत राहिल असं म्हणत होते, आता तो जूनपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या देशात मार्च, एप्रिल, मे महिन्यात उन्हाळा असतो आणि उष्णता असते. एल निनो जर टिकून राहणार असेल, तर उष्णता सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. या तीन महिन्यांच्या उष्णतेवर आपलं जून महिन्यातील मान्सूनचं आगमन अवलंबून असेल, तर त्याच्यावर एल निनोचा परिमाण होऊ शकतो.”

पण, वातावरणात सुपर एल निनो सक्रिय आहे की नाही, हे कधीपर्यंत कळेल या प्रश्नावर माणिकराव खुळे सांगतात, Havaman Andaj 2024  “भारतीय हवामान खातं मान्सून संदर्भात पहिलं भाकित एप्रिल महिन्यात देणार आहे. त्याचं निरीक्षण आतापासून चालू आहे. जागतिक पातळीवरच्या नोंदी यात घेतल्या जातात, त्याचं विश्लेषण केलं जातं. त्यामुळे एप्रिल महिन्यात सुपर एल निनो आहे की नाही याबद्दल बरीचशी कल्पना आपल्याला येईल.”

त्यामुळे आता एल निनो, सुपर एल निनो आणि हवामान Havaman Andaj 2024 बदलाचा परिणाम येत्या हंगामावर किती कसा होईल, ते येणाऱ्या काळात कळेल.

यंदाचा अर्थातच 2023 च्या मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. हवामानव खात्याने सांगितल्याप्रमाणे, यंदा सरासरीच्या तुलनेत जवळपास 12% कमी पाऊस झाला आहे.

म्हणजे राज्यात फक्त 88% पाऊस बरसला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या मान्सून काळात पावसाचे असमान वितरण देखील पाहायला मिळाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

सोयाबीन, कापूस, मका यासह विविध पिकांच्या उत्पादनात घट आली. खरे तर मान्सून सुरू होण्यापूर्वीच अमेरिकेच्या हवामान खात्याने 2023 च्या मान्सूनवर एलनिनो परिणाम करणार असा अंदाज वर्तवला होता.

भारतासह संपूर्ण आशिया खंडात यंदा दुष्काळाची झळ पाहायला मिळणार असे अमेरिकन हवामान खात्याने सांगितले होते. भारतीय हवामान विभागाने देखील एलनिनोमुळे देशात सरासरी एवढा किंवा कमी पाऊस राहणार असा Havaman Andaj 2024 अंदाज दिला होता.

पण एल निनोचा मान्सूनवर फारसा विपरीत परिणाम होणार नाही हे आयएमडीने स्पष्ट केले होते. मात्र यंदा एल निनोचा खरचं मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे. राज्य शासनाने राज्यातील बहुतांशी भागासाठी दुष्काळ जाहीर केला आहे.

मान्सून 2024 वर एल निनोचा परिणाम राहणार का ?

आता पुढील वर्षी देखील पावसाचा लहरीपणा राहणार का, मान्सून 2024 वर एल निनोचा परिणाम राहणार का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. Havaman Andaj 2024 तसेच पुढील वर्षी मान्सून काळात पाऊस कसा राहणार याबाबत विचारणा केली जात आहे. दरम्यान, याबाबत हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी महत्त्वाची माहिती दिली.

डॉक्टर महापात्रा यांनी म्हटल्याप्रमाणे, Havaman Andaj 2024 भारतीय मान्सूनवर परिणाम करणारी एलनिनो प्रणाली डिसेंबर 2023 अखेरपर्यंत सक्रीय राहील असा एक Havaman Andaj 2024 अंदाज आहे. तसेच फेब्रुवारी २०२४ नंतर एलनिनो पूर्णतः निष्क्रीय होण्याची प्रक्रिया सुरू होईल असेही त्यांनी म्हटले आहे. 

यामुळे पुढील वर्षी येणाऱ्या मान्सूनवर एल निनोचा परिणाम होणार नाही असे महापात्रा यांनी सांगितले आहे. २०२४ च्या मान्सूनवर एलनिनोचा कोणताही परिणाम राहणार नाही. Havaman Andaj 2024 या काळात हिंद महासागरीय द्विधुविता (इंडियन ओशन डायपोल) ही निष्क्रीय होईल. त्यामुळे पुढील वर्षी मान्सून हा सामान्य राहील असं बोलले जात आहे. निश्चितच असं झालं तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

1 thought on “Havaman Andaj 2024: 1972 पेक्षा 2024 चा दुष्काळ भीषण असणार अमेरिकेच्या वेध शाळेचा अंदाज पहा पूर्ण हवामान अंदाज”

Leave a Comment

error: कॉपी करायचे नसते भावा. शेअर करायचे असते