Solapur pik vima यादी जाहीर | अखेर या 8 महसूल मंडळांना वगळण्यात आले | १ लाख ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ८७ कोटी जमा

 

Solapur pik vima यादी जाहीर | अखेर या महसूल मंडळांना वगळण्यात आले | १ लाख ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ८७ कोटी जमा

download 

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा कंपनीने Solapur pik vima जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीन, मका र व बाजरी पिकांच्या नुकसानीचे जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ९५९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८७ कोटी ११ लाख ३९ हजार २७७ रुपये जमा झाले आहेत.

मका पिकांच्या नुकसानीचे ३ हजार ३२९ • शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३९ लाख २१ हजार ९६७ रुपये, बाजरी पिकांच्या नुकसानीचे २१ हजार ४५७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ कोटी ९४ लाख ७१ हजार ९४६ रुपये दर सोयाबीन पिकांच्या नुकसानीचे १ लाख १६ हजार १७३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ८० कोटी ७७ लाख ४५ हजार ३६४ रुपये जमा करण्यात आले आहेत.

https://youtu.be/Mu2kDp1htAA?si=Dbc1VMJT2VDA5N6i

प्रधानमंत्री पीक विमा Solapur pik vima योजनेंतर्गत पीक विमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका व बाजरी पिकांसाठी पात्र विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान • भरपाई रक्कम नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून वितरीत केली जाणार होती. परंतु विमा कंपनीने सोयाबीन पीक विमा रक्कम संदर्भात विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केले. त्या अपिलाच्या सुनावणीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीचे सर्व मुद्दे खोडून काढले.

Solapur pik vima

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे कंपनीला अखेर शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम द्यावीच लागली आहे. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाली. प्रधानमंत्री पीक विमा Solapur pik vima योजनेंतर्गत जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीस केली होती.

सोलापूर जिल्ह्यातील Solapur pik vima तालुका निहाय शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक विम्याची रक्कम पुढीलप्रमाणे, अक्कलकोट तालुक्यातील १९ हजार ०७७ शेतकऱ्यांना १० कोटी ७९ लाख ९८ हजार ४९५ रुपये, बार्शी तालुक्यातील ७० हजार २०३ शेतकऱ्यांना ४७ कोटी ०८ लाख ५२ हजार ८७१ रुपये, करमाळा तालुक्यातील २ हजार ४९३ शेतकऱ्यांना ४६ लाख ०५ हजार ४१९ रुपये.

माढा तालुक्यातील ७७४ शेतकऱ्यांना १० लाख ७९ हजार ६२६ रुपये, माळशिरस तालुक्यातील ४ हजार ५३६ शेतकऱ्यांना १ कोटी १ लाख ४९ हजार ८५० रुपये, मंगळवेढा तालुक्यातील ७ हजार ००६ शेतकऱ्यांना १ कोटी ८४ लाख ५९ हजार ०८१ रुपये, मोहोळ तालुक्यातील ८ हजार २११ शेतकऱ्यांना ४ कोटी ९८ लाख ९३ हजार ४९३ रुपये, पंढरपूर तालुक्यातील ४८३ शेतकऱ्यांना ५ लाख ४६ हजार १७८ रुपये

सांगोला तालुक्यातील ८ हजार ८८६ शेतकऱ्यांना २ कोटी ६९ लाख ३७ हजार १३९ रुपये, उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ हजार ३८५ शेतकऱ्यांना १० कोटी १५ लाख २८ हजार ३१९ रुपये, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७ हजार ९०५ शेतकऱ्यांना ७ कोटी ९० लाख ८८ हजार ८०५ रुपये देण्यात आले आहेत. विमा कंपनीने Solapur pik vima जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ९५९ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ८७ कोटी ११ लाख ३९ हजार २७७ रुपये नुकसान भरपाई अग्रीम जमा केलेले आहे.

Leave a Comment

error: कॉपी करायचे नसते भावा. शेअर करायचे असते